मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या भावात चढउताराचा ट्रेंड (Gold-Silver Rate Today) दिसून आला होता.

आज मात्र, सोने-चांदीने दिलासा दिला आहे. त्यामुळे आज (27 फेब्रुवारी) सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज चांदीची किंमत आपटली. तर सोन्याने देखील दिलासा दिला आहे. आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

आजचे सोने-चांदीचे दर

मागच्या आठवड्यामध्ये सोने 200 रुपयांनी तर चांदी 400 रुपयांनी महागली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी घसरण झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजीसोन्याच्या किमतीत 200 रुपयांची वाढ झाली होती. तर 26 फेब्रुवारी रोजी किंमती 160 रुपयांनी उतरल्या.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

21 फेब्रुवारी रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. आता या आठवड्यात सुरुवातीलाच 400 रुपयांनी चांदी घसरली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये झाला आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

Leave a Comment