नताशाला 70 टक्के हिस्सा दिल्यावर हार्दिककडे काय उरणार?, एकूण संपत्ती किती?

hardik-pandya-net-worth-in-front

Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या व्यक्तीगत आयुष्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जातंय. हार्दिकचे पत्नी नताशा स्टँकोव्हिचसोबत (Natasa Stankovic) संबंध बिघडल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

इतकंच नाही तर, ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. अशात नताशाने जर हार्दिकला घटस्फोट दिला तर त्याला संपत्तीत नताशा स्टँकोव्हिचला 70 टक्के वाटा द्यावा लागेल, असं म्हटलं जातंय.

घटस्फोटानंतर नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागणार?

हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला आणि जर त्याला त्याच्या संपत्तीपैकी 70% रक्कम द्यावी लागली तर या स्टार क्रिकेटरच्या संपत्तीत लक्षणीय घट होईल. त्याच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत हार्दिककडे नेमकं काय उरणार?, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अशात हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर (Hardik Pandya ) कधीकाळी 200 रुपयांमध्ये टूर्नामेंट खेळणारा हार्दिक आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. क्रिकेटशिवाय तो जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो.

हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?

अलीकडेच बीसीसीआयने सेंट्रल कराराची घोषणा केली होती. त्यात हार्दिकला (Hardik Pandya ) ग्रेड-A मध्ये स्थान देण्यात आलंय. त्यामुळे यावर्षी मंडळाकडून त्याला 5 कोटी रुपये मिळतील. हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगमधूनही करोडोंची कमाई करतो. यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटी रुपयांना गुजरात टायटन्सकडून खरेदी केले.

यापूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिकला IPL 2022 आणि IPL 2023 साठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. हार्दिकने आतापर्यंत बोट , Amazon Alexa, Reliance Retail, Star Sports Monster Energy, Britannia Bourbon, Sin Denim, Gulf Oil India, Dream11, Accelerate, Sold Store, या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत.

या ब्रँडच्या जाहिरातींमधून हार्दिक (Hardik Pandya ) कोटींची कमाई करतो. इतकेच नाही तर हार्दिकचे मुंबईतील वांद्रे येथे 30 कोटींचे घर असून, वडोदरा येथेही त्याचा एक आलिशान बंगला आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. पाहायला गेलं तर अजून नताशा आणि हार्दिक या दोघांनीही घटस्फोटाबद्दल अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये.मात्र, त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अजूनही रंगत आहेत.

Leave a Comment