Jilha Parishad Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग नुसार जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग कडील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. त्याकरिता खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
◾भरती विभाग : जिल्हा परिषद पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾ZP अंतर्गत बांधकाम विभाग मध्ये ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ६५ पेक्षा अधिक नसावे.
◾भरती कालावधी : ११ महिन्यांचे करार पध्दतीने पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २.
◾आवश्यक पात्रता : पदवीधर / पदविकाधारक शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २, गट-ब रापत्रित अराजपत्रीत असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उमेदवारने जाड फुलस्केप कागदावर स्वतःचे नांव (आडनांव प्रथम), जन्म दिनांक, वय, लिंग, पत्रव्यवहाराचा तपशिल माहितीसह अर्ज सादर करावा. अर्जाच्या वरील डाव्या बाजूस अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविणेत यावा. व आपले स्वाक्षरीने साक्षांकित करणेत यावा.
◾अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे साक्षांकित करुन जोडावीत : (अ) सेवानिवृत्त आदेशाची व कार्यमुक्त आदेशाची प्रत
(ब) सेवानिवृत्ती वेतन मंजूर पी.पी. ओ.ची प्रत
(क) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र
(ड) संगणक अर्हता (MSCIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
◾कंत्राटी शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांची नियुक्ती ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार तत्त्वावर करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशानाचे/ सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकारी/ हक्क नसेल.
◾नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकारी राहतील.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामाती व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्र/ माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
◾करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.
◾करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकारी प्रदान करता येणार नाहीत.
◾सदरचे पद कंत्राटी (करार) पध्दतीने भरावयाचे असल्याने शासकीय सेवकांच्या सेवा सवलती व आर्थिक लाभ याचा फायदा मिळणार नाही. तसेच कोणतेही कायदेशीर हक्क राहणार नाहीत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
जिल्हा परिषद पुणे, बांधकाम विभाग उत्तर मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ ही एकूण 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुणे मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय ६५ पेक्षा अधिक नसावे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकतात. नियम व अटी : उमेदवाराने जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक असल्याचे खात्री करुनच अर्ज करणे आवश्यक राहील, अर्जात चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असल्यास व उमेदवार योग्य पात्रताधारक नसल्याचे आढळून आल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल.
आपली कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर निवड झालेनंतर आपले विरुध्द कोणत्याही प्रकारची पोलीस केस अथवा न्यायालयीन केस प्रलंबित नसलेचा चारित्र्य पडताळणी दाखला आपले नजिकचे पोलिस स्टेशनवरुन आणून देणे बंधनकारक असेल. खाते निहाय चौकशी सुरु नसलेचा व कोर्ट केस नसलेचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. श्रेत्रीय स्तरावर करार पध्दतीने नेमणूक दिलेल्या कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवाकालामध्ये काही नैसर्गिक अपधात व काही आजार उद्भवल्यास कार्यालय/शासन कोणत्याही प्रकारची भरपाई देणार नाही व बांधील राहणार नाही. कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवा काळामध्ये अनुज्ञेय मानधन व इतर भत्ते शासननिर्णय/नियमांस अधिन राहून अदा करणेत येतील.
करारनामा कालावधीमध्ये नियुक्तीचे ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांचेवर शासनकडील आवश्यक ते निर्णय / नियम व वेळोवळी निर्गमित होणारे शासन निर्णय बंधनकारक राहतील. अर्ज अंतिम तारीख पर्यंत बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे येथे पोहोचतील असे पहावे, त्यानंतर आलेल्या विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर 2024 ही आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता: बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |