मान्सूनची दणक्यात एंट्री; पुढील दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monsoon-Rain-Update

Monsoon update | राज्यातील सर्वच नागरिक प्रचंड गरमीने हैराण झाले आहेत. अशातच आता नागरिकांना या त्रासापासून लवकरच सुटका मिळणार आहे. कारण हवामान खात्याकडून मान्सून संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या वर्षी मान्सून वेळेआधीच केरळात धडकला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल :

मुंबईमध्ये येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. कारण मुंबईत मान्सूनची चाहूल लागली आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुढील 48 तासात मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे.

मात्र आज आणि उद्या मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे या भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, केरळमध्ये अगदी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 30 मे रोजी दाखल झालेला मान्सून कधीही कर्नाटकात पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात मान्सूनचा पाऊस 3 जूनपासून सुरु होणार आहे. मात्र यंदा 30 मे रोजीच मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे.

Monsoon update | हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट :

हवामान विधाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये आज आणि उद्या पारा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून चांगलाच दिलासा मिळणार आहे. अशातच ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. त्यामुळे आयएमडीने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबदलत्या वातावरणामुळे अरुणाचल, मेघालय, आसाम, सिक्कीम या भागात अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. याशिवाय अंदमान-निकोबार बेटे आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment