Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: सेन्सॉर बोर्डाने शाहिद-क्रितीच्या इंटिमेट सीन्सवर कात्री चालवली

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya : शाहिद कपूरला बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हटले जाते. त्याचा पुढचा चित्रपट ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ लवकरच रिलीज होणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत, मात्र सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही इंटिमेट सीन्स कापल्याची बातमी आहे.शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रेमकथा दाखवण्यात आली असून यात अनेक रोमँटिक सीन आहेत. पण आता बातमी येत आहे की, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 25 टक्के बोल्ड सीन्स काढून टाकले आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya चित्रपटाच्या या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya

रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूरच्या ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ या चित्रपटातून काही इंटिमेट सीन्स हटवण्यात आले आहेत. चित्रपटातील एक इंटिमेट सीन 36 सेकंदांचा होता. मात्र आता सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनंतर हा इंटिमेट सीन 9 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे हा सीन आता 27 सेकंदांचा असणार आहे.

या चित्रपटातील काही संवाद बदलण्यात आले आहेत आणि “दारू” हा शब्द काढून त्याऐवजी “ड्रिंक्स” वापरण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना निर्देश दिले आहेत की जेव्हा जेव्हा धूम्रपानाशी संबंधित दृश्ये असतील तेव्हा त्यांना हिंदीमध्ये मोठ्या अक्षरात लिहावे लागेल की धूम्रपान आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. 2 फेब्रुवारी रोजी CBFC ने “Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya” चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे.

‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ जबरदस्त एडवांस बुकिंग मिळाले

‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चित्रपटातील गाणी आणि पोस्टरमध्ये त्यांची जोडी अप्रतिम दिसते. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या एडवांस बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच लाखोंची कमाई केली आहे.

‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ची 22 हजारांहून अधिक तिकिटे आतापर्यंत विकली गेली आहेत. यासह चित्रपटाने 45.55 लाखांचा व्यवसाय केला आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ची ही एडवांस बुकिंग चांगली सुरुवात मानली जात आहे. आता पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कृती साकारणार रोबोटची भूमिका?

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ही एक कंप्यूटर इंजीनियर आर्यनची कथा आहे, ज्याची भूमिका शाहिद कपूरने साकारली आहे. क्रिती एका रोबोटची भूमिका साकारत आहे, ज्याचे नाव सिफ्रा आहे. सिफ्रा हा बॅटरीवर चालणारा रोबोट आहे.

आता माणूस आणि रोबोटची ही प्रेमकहाणी कशी असेल, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय धर्मेंद्र, डिंपल कपाडिया, राकेश बेदी आणि इतर अनेक कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे.

गेल्या वर्षी शाहिद जर्सी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होता. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. त्याचप्रमाणे क्रिती सेनॉनचा आदिपुरुष हा चित्रपटही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षक क्रिती आणि शाहिदच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

1 thought on “Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: सेन्सॉर बोर्डाने शाहिद-क्रितीच्या इंटिमेट सीन्सवर कात्री चालवली”

Leave a Comment